Nitin Khandare : ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असूनही कठाेर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अकाेला जिल्ह्यातील पाटखेड येथील प्रा. डाॅ. नितीन खंडारे यांनी आणखी एक यशाचे शिखर गाठले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित सेट जून २०२५ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत प्रा. डॉ. नितीन अभिमान खंडारे यांनी लाइफ सायन्सेस या विषयात उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.
वाडेगाव : ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असूनही कठाेर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अकाेला जिल्ह्यातील पाटखेड येथील प्रा. डाॅ. नितीन खंडारे यांनी आणखी एक यशाचे शिखर गाठले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित सेट जून २०२५ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत प्रा. डॉ. नितीन अभिमान खंडारे यांनी लाइफ सायन्सेस या विषयात उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.
सध्या प्रा. डॉ. खंडारे हे श्री. वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी (जि. अमरावती) येथे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. डॉ.सोनाली नितीन खंडारे, मा. सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी माणिकराव बानाजी जंजाळ, रत्नमाला माणिकराव जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक (अकोला) राहुल माणिकराव जंजाळ, आयु. ॲड. पूजा राहुल जंजाळ, धीरज माणिकराव जंजाळ, मधुरा धीरज जंजाळ, सिव्हिल इंजिनिअर स्वप्नील तायडे, एम.एस्सी. गणित व सेट नेते प्रा. मोनाली स्वप्नील तायडे, इंजिनिअर डॉ. प्रमोद अंभोरे, संजीवनी प्रमोद अंभोरे आदींनी सहकार्य व शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल वाडेगाव परिसरात डॉ. नितीन अभिमान खंडारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.