Deulgaon Mali : पाणीपुरीची गाडी लावण्यावरून एका उत्तर प्रदेशातील पाणीपुरी विक्रेत्यासह ज्येष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना देऊळगाव माळी येथे २२ ऑगस्ट राेजी घडली. ऐन पाेळ्याच्या दिवशीची ही घटना घडली. या प्रकरणी मेहकर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मेहकर : पाणीपुरीची गाडी लावण्यावरून एका उत्तर प्रदेशातील पाणीपुरी विक्रेत्यासह ज्येष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना देऊळगाव माळी येथे २२ ऑगस्ट राेजी घडली. ऐन पाेळ्याच्या दिवशीच ही घटना घडली. या प्रकरणी मेहकर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देऊळगाव माळी येथे पाेळ्याच्या दिवशी पाणीपुरीची गाडी लावण्यावरून जितेंद्र सिंग प्रयाग नारायण बगेल यांचे दाजी व वासुदेव देविदास मगर यांच्यात वाद झाला. या वादातून मगर याने जितेंद्र सिंग यांचे दाजी यांना मारहाण केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकालाही मारहाण केल्याचे जितेंद्र सिंग याने मेहकर पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून मेहकर पाेलिसांनी आराेपी वासुदेव मगर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीदरम्यान पाणीपुरीची गाडी उलटल्याने जितेन सिंग यांच्या दाजीचे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कोरडे हे करीत आहे.