Ram Mahalle : पातूर तालुका काॅंग्रेस कमेटीच्या सरचिटणीसपदी दिंग्रस खुर्द येथील सरपंचपुत्र तथा प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते राम सुरेश महले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल साेनाेने
दिग्रस बू : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काॅंग्रेस पक्षाने तयारी सुरू केली असून पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. तसेच विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पातूर तालुका काॅंग्रेस कमेटीच्या सरचिटणीसपदी दिंग्रस खुर्द येथील सरपंचपुत्र तथा प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते राम सुरेश महले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गावंडे यांनी राम महल्ले यांना नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे. सरपंचपुत्र असलेले राम महल्ले हे गत अनेक वर्षांपासून काॅंग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या कामाची दखल घेवून थेट काॅंग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राम महल्ले यांच्या नियुक्तीमुळे काॅंग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे.