Ganpati Bappa Morya : गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनांनी साखरखेर्डा नगरी दुमदुमली. ६ सप्टेंबर राेजी विसर्जन मिरवणुकीत गावातील ८ गणेश मंडळांनी सहभागी घेतला. त्यापूर्वी सकाळी बालगणेश मंडळाच्या १५ मंडळातील कार्यकर्त्यांनी विसर्जन केले.
साखरखेर्डा : गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनांनी साखरखेर्डा नगरी दुमदुमली. ६ सप्टेंबर राेजी विसर्जन मिरवणुकीत गावातील ८ गणेश मंडळांनी सहभागी घेतला. त्यापूर्वी सकाळी बालगणेश मंडळाच्या १५ मंडळातील कार्यकर्त्यांनी विसर्जन केले .
सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दुपारी दोन वाजता दगडी मस्जिद समोर आले. तेथून मुख्य मिरवणूक सुरू झाली . गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या , या गगनभेदी गर्जनाने साखरखेर्डा नगरी दुमदुमली होती. महात्मा ज्योतिबा फुले मंडळाने यावर्षी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली. त्या पाठोपाठ अहिल्याबाई होळकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , बालनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , परदेशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , श्री शिवाजी व्यायाम शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , हिंदू सुर्य महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , संत रविदास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , श्री शिवाजी हायस्कूल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते . प्रत्येक मंडळासमोर आप आपले कार्यकर्ते नाचत होते . दगडी मस्जिद, गुजरी चौक , अहिल्याबाई होळकर नगर , रोहिल पुरा , महात्मा ज्योतिबा फुले नगरातून मिरवणूक सायंकाळी सात वाजता भोगावती नदीवरील पुलावर विसर्जन मिरवणूक थांबली . त्यानंतर गायखेडी तलाव , महालक्ष्मी तलाव आणि महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री शिवाजी व्यायाम शाळा मंडळांनी पेनटाकळी प्रकल्पावर श्री गणरायाचे विसर्जन केले. ग्राम पंचायतीच्या वतीने सरपंच ज्योती अमित जाधव आणि कर्मचाऱ्यांनी ग्राम पंचायत समोर पुष्पवृष्टी करीत गणरायाला निरोप दिला. तर संपूर्ण मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालीत मनोभावे पुजा केली . यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव , माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल , सरपंच ज्योती अमित जाधव , उपसरपंच अंकिता संग्रामसिंह राजपूत , तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर , शांतता कमेटी सदस्य रावसाहेब देशपांडे , अशोक इंगळे , डी एन पांचाळ , रमेश ठोसरे , डॉ . निलम महाजन , संजय जगताप , गजानन इंगळे , निलेश पोंधे , शिवा पाझडे , अंकुर देशपांडे , गोपाल भिमराव शिराळे , रामदाससिंग राजपूत , बादलसिंग राजपूत , सुरेश राजपूत , संतोष राजपूत , गोपाल राजपूत , शिवा गायकवाड , राजु जैन , जगदिश इंगळे , बालाजी इंगळे , शिवाजी शर्मा , देवानंद खंडागळे , शैलेश देशपांडे आशिष कामे यांनी आप आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांना शांततेत विसर्जन कसे होईल यासाठी प्रयत्न केले. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी वेळोवेळी बैठका घेऊन उत्सव आनंदाने साजरा करताना इतर समाजाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. ६ सप्टेंबर रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड , दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप , पी एस आय गणेश डोईफोडे , राखीव पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक धैर्यशील गाडगे , पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील , बुलढाणा राखीव दलाचे राकेश बुरम , राहुल दिवान त्यांच्या समवेत ३४ पोलीस कर्मचारी , ४३ होमगार्ड , २२ आर सी पी कर्मचारी , राज्य राखीव दलाची टीम बंदोबस्ताला होती .