Roads in Balapur : शहरातील अकोला नाका ते खामगांव नाका या मुख्य रस्त्याची अक्षरशा चाळणी झालेली आहे. तसेच अकोला नाका ते बाजारापर्यंतच्या रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच पादचारी यांना या रस्त्यावरून चालावे कसे असा प्रश्न पडला आहे.

बाळापूर : शहरातील अकोला नाका ते खामगांव नाका या मुख्य रस्त्याची अक्षरशा चाळणी झालेली आहे. तसेच अकोला नाका ते बाजारापर्यंतच्या रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच पादचारी यांना या रस्त्यावरून चालावे कसे असा प्रश्न पडला आहे. याच रोडवर श्रीमती धनाबाई विद्यालय व कला, वाणिज्य विज्ञान विद्यालयाचे सर्व विद्यार्थी जाणे येणे करीत असतात या रस्त्यात पडलेल्या खड्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर वाहनांच्या ये-जा मुळे खड्यांतील घाण पाणी उडते. त्यामुळे वाहन चालक व विद्यार्थ्यांमध्ये बरेचवेळा वाद हाेतात. याकडे लक्ष देवून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी श्री गणेश उत्सव समिती व बाळापूर शांतता समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच एका पुलाचे पावसाच्या पूरामुळे कठडे वाहुन गेल्याने एकाच पुलावरून वाहतुक चालु असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. संबंधित रोडच्या कामाचे टेंडर (निविदा) मंजुर झालेली आहे संबंधित खात्याने ते काम लवकरात लवकर करावे तसेच महत्वाचे सद्या गणेश उत्सव सुरू आहे भाविक भक्तांना श्री. गणेश मुर्तीची ने-आण करण्यास खुप त्रास सहन करावा लागला असुन आता विसर्जन मिरवणुक सुध्दा जवळ आली असुन या विसर्जन मिरवणुकीपूर्वी या रस्त्याचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच बाळापूर शहरातील विसर्जन मुख्य मिरवणुका मार्गाचे कामाचे टेंडर सुध्दा मंजुर झालेले आहे है दोन्ही मार्ग श्रींचे विसर्जन मिरवणुक पुर्वी वरील रस्त्यांची दुरूस्ती किंवा नुतणीकरण करण्यात यावे ही कामे न झाल्यास बाळापूर शांतात समिती व श्री गणेश मंडळांनी आपल्या मुत्यांचे विसर्जन करणार नाहीत, असा इशारा निवेदना दिला आहे.निवेदनावर गजानन पुरी महाराज, अशाेक मंडले, गजानन इंगळे, गणेश भाजीपाले, रमेश लाेहकरे, गजानन खाराेडे, गणेश धाेपटे, गणेश भिसे, आनंद बनचरे आदींची स्वाक्षरी आहे.