Road work : वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाली नसल्याने २५ ऑगस्ट राेजी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले हाेते. त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र, आंदाेलन करून १२ दिवस लाेटूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे, अधिकाऱ्यांचे आश्वासन कागदावरच असल्याचे चित्र आहे.
राहुल सोनोने
वाडेगाव : पातुर तालुक्यातील दिग्रस–तुलंगा–लावखेड व सुकळी फाटा ते चान्नी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे, वाहन चालकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून अपघात वाढले आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाली नसल्याने २५ ऑगस्ट राेजी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले हाेते. त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र, आंदाेलन करून १२ दिवस लाेटूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे, अधिकाऱ्यांचे आश्वासन कागदावरच असल्याचे चित्र आहे.
पातुर तालुक्यातील दिग्रस–तुलंगा–लावखेड व सुकळी फाटा ते चान्नी या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्यांमध्ये सध्या पाणी साचत असल्याने दुचाकी स्वारांना अंदाज येत नाही. त्यामुळे, अपघात वाढले आहे. या रस्याच्या दुरूस्तीसाठी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता दिग्रस बू बसस्थानक परिसरात शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चतारकर यांनी ७ दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आता १२ दिवस उलटून गेले तरीही कामास सुरुवात झालेली नाही.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, “रस्त्याचे काम तात्काळ सुरू झाले नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
आंदोलनावेळी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे, वंचित युवक सुनील बंड, सरपंच जहूर खान, मनोज गवई, विजय गवई, सदानंद भुस्कुटे, राजेश बद्रखे, अजय बद्रखे, अतुल खंडारे, वसंत महाले, महेश बद्रखे, विठ्ठल खडके, चक्रधर बंड, प्रमोद मोरे, खुशालराव तायडे, गोविंद पाटील, विजय पाटील, हरिदास धोत्रे, बाजीराव ताले, रामदास चिकटे, मना बेलोकार, शशिकांत ताले, रुपराव तायडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच जहूर खान म्हणाले, “रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन धूळखात पडले असून ग्रामस्थांची फसवणूक झाली आहे.”
सामाजिक कार्यकर्ते खुशालराव तायडे यांनीही प्रशासनावर टीका करत सांगितले, “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त लेखी आश्वासन देऊन ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. यापुढे ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत.”