PM Kisan Samman Nidhi: केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांपैकी दाेन हजार ७७९ शेतकऱ्यांची ई केवायसी आणि चार हजार २५३ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी समृद्धी वांगसकर यांनी केले आहे.
बुलढाणा : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांपैकी दाेन हजार ७७९ शेतकऱ्यांची ई केवायसी आणि चार हजार २५३ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी समृद्धी वांगसकर यांनी केले आहे.या शेतकऱ्यांनी ई केवायसी आणि आधार सिडींग न केल्यास पीएम किसानच्या लाभापासून मुकणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजे लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.