mahabreaking.com

Eid-e-Miladunnabi :ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबीराचे आयाेजन 

Eid-e-Miladunnabi : जातीय सलोख्याचे प्रतीक असलेल्या मलकापूर पांग्रा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी एकत्र आल्याने एकूण ५७जणांनी रक्तदान केले होते.यावर्षीही मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
मलकापूर पांग्रा : जातीय सलोEid-e-Miladunnabiख्याचे प्रतीक असलेल्या मलकापूर पांग्रा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी एकत्र आल्याने एकूण ५७जणांनी रक्तदान केले होते.यावर्षीही मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते होणार आहे. हे शिबिर मलकापूर पांग्रा पोलीस मदत केंद्रासमोर भरविण्यात आले असून गावातील सर्व हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिबिरात रक्तदात्यांसाठी खीर, पुरी, गोड भात, शरबत, फळे यांचे वाटप करण्यात येईल. रक्तदानानंतर गावातील जामा मस्जिद येथून ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीला सुरुवात होऊन बसस्थानक मार्गे हुसेनिया मशीद येथे सांगता होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top