Samadhan Shingane : सन २०२५-२६साठी हमी भावाने सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नाेंदणी करावी लागणार आहे. देऊळगांव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील व परीसरातील शेतकऱ्यांनी सीसीआयला कापुस विक्री करणेसाठी नाेंदणी करावी, असे आवाहन सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.

देऊळगांव राजा : सन २०२५-२६साठी हमी भावाने सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नाेंदणी करावी लागणार आहे. देऊळगांव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील व परीसरातील शेतकऱ्यांनी सीसीआयला कापुस विक्री करणेसाठी नाेंदणी करावी, असे आवाहन सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.
ही नाेंदणी १ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये कपास किसान या मोबाईल अॅपव्दारे स्वतः नोंदणी करता येणार आहे. ३०/०८/२०२५ पासुन गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल ios स्टोअर वरुन कपास किसान अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे.
अशी करता येणार नाेंदणी
कपास किसान अॅप डाऊनलोड करा, २०२५-२६ चा ७/१२ उतारा, महसुल प्राधिकरणाने प्रमाणीत केलेल्या पिक लागवडीची नोंद (२०२५-२६ चे ऑनलाईन अद्यावत), वैध आधार कार्ड, फोटो, बँकेचे पासबुक, कपास किसान या अॅप्स मध्ये विचारलेल्या पश्नांची उत्तरे व माहीती क्रमवार भरणे, ही प्रकिया स्वतः शेतकरी बांधवांनी स्वतःचे मोबाईल वरुनच करणे आवश्यक आहे.
मागील वर्षीचे कापुस हंगामामध्ये बाजार समितीने शेतकरी बांधवांचे सोईसाठी सिसिआई चे अधिकारी यांचेमार्फत बाजार समिती कार्यालयांत ऑनलाईन नोंदणी करुन सर्व शेतकरी बांधवानां ऑनलाईन करणेची सुविधा उपलब्ध करुन दिली होती व त्यानुसार जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात समिती यार्डात कापुस विक्रीसाठी आणला होता. सर्व कापुस उत्पादक शेतकरी बांधवांनी वरील सुचनेनुसार दिं. ०१/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ पर्यंत नोंदणी करुन घ्यावी. हमी भावाने कापुस खरेदी फक्त जे शेतकरी बांधव ऑनलाईन नोंदणी करतील त्यांचाच कापुस सिसिआई खरेदी करणार आहे म्हणुन सर्व शेतकरी बांधवांनी हमी भावाने कापुस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी तसेच हमी भाव योजनेचा लाभ व्हावा म्हणुन शेतकरी बांधवांनी गावामध्ये कापुस विक्री न करता मार्केट यार्डात विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, उपसभापती दादाराव खार्डे व संपूर्ण संचालक मंडळाने केले आहे.