Maratha community celebrates : मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर तेल्हारा शहरातील स्थानिक टॉवर चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
तेल्हारा : मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर तेल्हारा शहरातील स्थानिक टॉवर चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठा समाजाला त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला तसेच उर्वरित मागण्या मान्य करून जी.आर. जारी केला.या पार्श्वभूमीवर तेल्हारा तालुका आणि शहरातील मराठा समाजाच्या वतीने टॉवर चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोकराव बिहाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी विजय देशमुख (बाजार समितीचे उपसभापती), हरिदास वाघ, प्रशांत देशमुख, राजेश पाटील खारोडे, अरविंद तिव्हाने, सदानंद खारोडे, सत्यशिल सावरकर, अनुप मार्के, विवेक खारोडे, अजय गावंडे, चंद्रकांत मोरे, हेमंत अवचार, चेतन नराजे, अनंतराव सोनमाळे, भैय्या खारोडे, सुधाकर गावंडे, रवि देशमुख, रविंद्र ढाकरे, पिटुं पाथ्रिकर, अतुल देशमुख, गौरव अरबट, मोहन वरणकार, बंडू नेमाडे, विक्की खुमकर यांच्यासह तालुक्यातील मराठा समाजातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. जल्लोषादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तेल्हारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तळेगाव बाजार येथेही जल्लोष
तालुक्यातील तळेगाव बाजार येथेही मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या आनंदात शिवाजी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुरलिधर खारोडे, शिवाजी पाटील, प्रविण खारोडे, ज्ञानेश्वर पाटील, प्रणव खारोडे, संजय खारोडे, शफिकभाई, गोलू खारोडे यांनी सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.