Leopard attacks goat : तालुक्यातील मनारखेड शिवारात बिबट्याचा वावर असून एका शेळीवर बिबट्याने ३ सप्टेंबर राेजी हल्ला केला. त्यामुळे, या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाळापूर : तालुक्यातील मनारखेड शिवारात बिबट्याचा वावर असून एका शेळीवर बिबट्याने ३ सप्टेंबर राेजी हल्ला
केला. त्यामुळे, या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मनारखेड येथील संदीप पुरुषोत्तम वाळे यांच्या शेळीवर ३ सप्टेंबर राेजी बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी विनोद गाडगे व त्यांच्या साथीदाराने यांनी ताबडतोब आरडाओरडा केल्याने बिबट्या शेळीला सोडून पळून गेला. सुदैवाने शेळीचे प्राण वाचले.या आधी सुद्धा गावातील बऱ्याच जनावरांची बिबट्याने शिकार केली आहे. यामुळे मनारखेड गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ६ दिवसा पुर्वी हिगणा शेळद शिवारात तुरीला खत देणाऱ्या सुरेश नावकार ६५ हे आपल्या मुला सोबत खत देत होते. या वेळी बिबट्याने हल्ला करुन जख्मी केले होते.त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत आहे पुढे हंगाम असल्याने शेतकऱ्यानी वनविभागाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सरपंच रंजना शेळके व परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.