Subedar Nagorao Tale : पातूर तालुक्यातील दिग्रस बू येथील सेवानिवृत्त सुभेदार नागोराव ताले यांना इंडियन आर्मीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मानद पदाने सन्मानित केले आहे.
राहुल सोनोने
दिग्रस बू : पातूर तालुक्यातील दिग्रस बू येथील सेवानिवृत्त सुभेदार नागोराव ताले यांना इंडियन आर्मीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मानद पदाने सन्मानित केले आहे.
सुभेदार नागोराव ताले यांनी भारतीय २१६ मराठा बटालियनमध्ये ३० वर्षे सेवा देत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुभेदार पदावरून सेवानिवृत्त होताना त्यांचा जल्लोषात समारोप समारंभही पार पडला.विशेष म्हणजे, त्यांच्या सेवेच्या परंपरेला पुढे नेत त्यांनी एकुलत्या एका मुलाला देखील भारतीय सैन्यात पाठविले आहे. त्यामुळे त्यांचा त्याग, देशसेवा आणि गावात मिळालेल्या मानद पदामुळे परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

मुलगाही सैन्यदलात
सुभेदार नागाेराव ताले यांनी एकुलता एक मुलगा असलेल्या निखील ताले यांनाही सैन्य दलात पाठविले आहे. त्यामुळे, त्यांच्या देशसेवेचे परिसरातील ग्रामस्थ काैतुक करतात. निखील ताले हे देखील वडीलांच्या पावलावर पाउल टाकत देशसेवा करीत आहेत.