House burglary solved : खामगाव शहरात झालेल्या घरफाेडीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख २० हजार ५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पंकज संजय देशमुख (२६, रा. खामगाव), अनिकेत गणेशराव देशमुख (२३, रा. खामगाव) आणि अभिषेक भिमराव हेलोडे (२१, रा. खामगाव) असे अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत.
खामगाव : खामगाव शहरात झालेल्या घरफाेडीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख २० हजार ५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पंकज संजय देशमुख (२६, रा. खामगाव), अनिकेत गणेशराव देशमुख (२३, रा. खामगाव) आणि अभिषेक भिमराव हेलोडे (२१, रा. खामगाव) असे अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत.
दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी शशांक पद्याकर देशपांडे (रा. केलानगर, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, २३ ते २७ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातून मोबाईल फोन, सीसीटीव्ही डिव्हीआर, डोंगल, लॅपटॉप, चांदीचे दागिने, नाणी, व्यायामासाठीचे डंबेल्स असा एकूण ₹५५,५००/- किंमतीचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी अप.क्र. ३४९/२०२५ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सखोल तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तीन आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून चांदी २७० ग्रॅम – ₹३३,५५४/, लॅपटॉप – ₹१६,५००, मोबाईल (३ नग) – ३०,०००/, मोटारसायकल – ४०,००० असा एक लाख २० हजार ५४ रुपयांचा एवज जप्त केला.
अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबूलकर यांच्या नेतृत्वात पोउपनि. पंकज सपकाळे, पोहेकॉ. एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळ, अजीज परसुबाले, विक्रांत इंगळे, चापोकॉ. शिवानंद हेलगे (स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा) तसेच पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. कैलास ठोंबरे (तांत्रिक विभाग) यांनी केली.