Hanuman Sagar : तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरण तुडुंब भरले आहे. १ सप्टेंबर राेजी या प्रकल्पाचे दाेन गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे, वान नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संग्रामपूर : तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरण तुडुंब भरले आहे. १ सप्टेंबर राेजी या प्रकल्पाचे दाेन गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे, वान नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान प्रकल्पात गत काही दिवसांपासून जलसाठ्यात वाढ हाेत आहे. धरणाचा जलसाठा सध्या ९० टक्यांवर पाेहचला आहे.तसेच प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने १ सप्टेंबर राेजी सकाळी ११ वाजता दोन दरवाजे प्रत्येकी ५० सेंमीने उघडण्यात आले. त्यातून वाण नदीपात्रात ८२.७३ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.