Farewell to Ganesha : येथे साई एकता गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ व नवयुवक गणेश मंडळ या तिन्ही गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गगनभेदी गर्जनांनी गणरायांना निराेप दिला.
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : येथे साई एकता गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ व नवयुवक गणेश मंडळ या तिन्ही गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गगनभेदी गर्जनांनी गणरायांना निराेप दिला.
साई एकता गणेश मंडळाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची विसर्जन मिरवणूक टाळ आणि मृदुंगाच्या गजरात पार पडली. यावेळी टाळ मृदंग व गायनाचार्य प्रेमानंद महाराज देशमुख माऊली आश्रम शाळा पांगरी फाटा येथील मुलं होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेवटची आरती पोलीस खात्यातील अधिकारी यांच्या कडून होत असते. यंदाही साखरखेर्डा पोलीस स्टेशन तथा मलकापूर पांग्रा बीटचे जामदार निवृत्ती पोपळे यांच्या हस्ते शेवटची आरती झाली. त्यानंतर वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरात गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला यात साई एकता गणेश मंडळाच्या वतीने साई एकता गणेश मंडळाचे विश्वस्त तथा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साई एकता गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम कायमच
मलकापूर पांग्रा येथील साई एकता गणेश मंडळ दरवर्षी सर्वधर्मसमभाव जपणारे कार्यक्रम घेत असतात. मुस्लिम समाजाचा अध्यक्ष बनवून तर कधी ईद-ए-मिलादुन्नबी वर फुलांचा वर्षाव करीत धार्मिकतेच्या भिंती तोडत असतात. एकात्मतेची भावना वृद्धिगत व्हावी गावात सलोखा आणि बंधुभाव नांदावा तो कायम टिकावा म्हणून साई एकता गणेश मंडळ नेहमी प्रयत्नशील असतो. मागील २२ वर्षापासून विविध प्रकारचे आधुनिक उपक्रम येथील गणेश मंडळाच्या वतीने राबवल्या जातात. त्यातूनच गणरायाच्या शेवटच्या आरतीचा मान पोलीस कर्मचाऱ्यांना दिला जातो. तो मान यावर्षी मलकापूर पांगरा बीट जमदार निवृत्ती पोफळे यांना मिळाला आहे हे विशेष.