Eid-e-Miladunnabi : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद ए मिलाद निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५१ जणांनी सहभाग घेतला. रक्तदान शिबिर गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. मागील दोन ते तीन वर्षापासून ईद-ए-मिलादूननबीच्या पर्वावर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभाग घेतात.
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद ए मिलाद निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५१ जणांनी सहभाग घेतला. रक्तदान शिबिर गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. मागील दोन ते तीन वर्षापासून ईद-ए-मिलादूननबीच्या पर्वावर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभाग घेतात.
जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून येथील सण-उत्सव साजरे होतात याचे प्रत्यय आजच्या रक्तदान शिबिरामधून दिसून आले सकाळी दहा वाजे दरम्यान कुराणपठण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बिट जमदार निवृत्ती पोफळे गुलशेर खासाब, साबीर मौलाना,दिलदार भैया, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद यार खान ,रफिक मास्तर तथा आयोजक मुस्लिम बांधवांनी उद्घाटन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. यात साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे बीट जमदार निवृत्ती पोफळेंसह पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले शिवश्री इंजिनीयर विष्णू सोनुने यांनीही रक्तदान केले. ईद-ए-मिलादुन्नबी आयोजक टीम तर्फे रक्तदात्यांना बिस्किट फळ वाटप करण्यात आले तर याच ग्रुपच्या वतीने भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच हिजामाचे देखिल प्रचारण करण्यात आले होते. यात बदनापूर येथील नूर हॉस्पिटल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिचार्ज बदनापूर यांना पाचारण करण्यात आले होते.