mahabreaking.com

Anganwadi in Dongaon : डाेणगावात अंगणवाडीसमाेरच साचली घाण, चिमुकल्यांचे आराेग्य धाेक्यात

Anganwadi in Dongaon : गावात गत काही दिवसांपासून अनेक  ठिकाणी घाण साचली आहे. अंगणवाडीसमाेरच कचऱ्याचा माेठा  ढिग लागल्याने लहान मुलांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देवून स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Anganwadi in Dongaon

डोणगाव  : गावात गत काही दिवसांपासून अनेक  ठिकाणी घाण साचली आहे. अंगणवाडीसमाेरच कचऱ्याचा माेठा  ढिग लागल्याने लहान मुलांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देवून स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डोणगाव येथे स्वच्छतेचा गंभीर अभाव जाणवत असून, ग्रामपंचायतीकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्यानंतरही गावातील घाणीची समस्या कायम आहे.
ग्रामपंचायत लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करीत असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तवात डोणगावच्या प्रत्येक भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. राज्य महामार्गावरील अण्णा भाऊ साठे सभागृहाजवळ, स्थानिक मोठ्या पुलाजवळ तसेच गावातील नाल्या तुडुंब घाणीने भरलेल्या आहेत.
विशेष म्हणजे नव्याने बांधलेल्या तलाठी भवनाजवळील अंगणवाडीसमोरच घाणीचे ढिग पडलेले आहेत. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top