Dedication of the Junior College building : शाहापूर येथील योगीराज ज्ञानपीठात ज्युनिअर कॉलेजच्या वास्तुचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीमती जानकीदेवी चांडक तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील प्रख्यात समाजसेवक व मार्गदर्शक विरेंद्र मोहनलाल चांडक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, स्वकर्तृत्व आणि समाजसेवेचे भान निर्माण झाले.

वाडेगाव : शाहापूर येथील योगीराज ज्ञानपीठात ज्युनिअर कॉलेजच्या वास्तुचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीमती जानकीदेवी चांडक तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील प्रख्यात समाजसेवक व मार्गदर्शक विरेंद्र मोहनलाल चांडक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, स्वकर्तृत्व आणि समाजसेवेचे भान निर्माण झाले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. रतनजी राठी , उपाध्यक्ष वसंतजी भट्टड, तसेच सचिव सौ सुनिता राठी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमात दहावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्यात आली. मुरलीधर भंसाली यांनी समाजासाठी योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आभार मुख्याध्यापिका माधुरी दाभाडे यांनी मानले. सर्व मान्यवर, पालक, शिक्षक आणि अकोला येथील समाजातील दानशूर व्यक्तींचे स्वागत करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि लोकार्पणाचा अभिमान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.यावेळी कार्यक्रमाला महेश राठी, मृदला राठी,सीमाताई राठी,रामेश्वर राठी,श्यामसुंदर राठी,सतीश राठी,अनिल सोनी, स्नेहल सोनी,पुष्पा अग्रवाल,प्रफुल चांडक,राजेंद्र चांडक,चिंतामणी चांडक,शहापूर येथील सरपंच सरस्वती बद्रखे,,उपाध्यक्ष वसंत भट्टड, सचिव सुनीता राठी,मुख्याध्यापिका माधुरी दाभाडे,कार्यक्रमाची प्रास्ताविक आढावा म्हणून संस्थेचे सहसचिव गजानन तिडके यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सोपान नवथले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण रावनचवरे ,विनोद जाधव,आशिष तिडके,उषा अंभोरे,सुजाता हिवराळे,शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित हाेते.