Talathi office : डोणगाव येथे सध्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी तलाठी कार्यालयाचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र कार्यालय सुरू होण्यापूर्वीच भिंतींना तडे गेल्याचे समोर आले असून, यामुळे बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी नागरिकांकडून चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
डोणगाव : डोणगाव येथे सध्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी तलाठी कार्यालयाचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र कार्यालय सुरू होण्यापूर्वीच भिंतींना तडे गेल्याचे समोर आले असून, यामुळे बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर प्रकरणी नागरिकांकडून चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
शासनाच्या वतीने डोणगाव येथे दोन तलाठी कार्यालये व मंडळ अधिकारी कार्यालय उभारले जात आहे. यासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी दिलेला असताना, अंदाजपत्रकानुसार काम न होता दर्जाहीन काम केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूर्ण न झालेल्या इमारतीला तडे गेल्याची बाब गंभीर मानली जात असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची गरज आहे.