‘Constitution : संविधान’ मात्र एक पुस्तक नसून ते एक ‘संकल्प’ रूपी मौलिक ग्रंथ आहे, असे मत डाॅ. वेदप्रकाश मिश्रा यांनी श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला येथे उद्घाटन समारोहात शनिवार, दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित आंतर-विद्याशाखीय एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून बोलताना व्यक्त केले.
आरडीजी महिला महाविद्यालयात भारतीय संविधानावर राष्ट्रीय परिषद संपन्न
अकोला : ‘संविधान’ मात्र एक पुस्तक नसून ते एक ‘संकल्प’ रूपी मौलिक ग्रंथ आहे, असे मत डाॅ. वेदप्रकाश मिश्रा यांनी श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला येथे उद्घाटन समारोहात शनिवार, दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित आंतर-विद्याशाखीय एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून बोलताना व्यक्त केले.
स्थानिक श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात भारतीय संविधानावर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सकाळी 10. 30 वा. उत्साहात पार पडले. परिषदेचे उद्घाटक म्हणून मा. डाॅ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तर बीजभाषक म्हणून डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्र-कुलगुरु, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) नागपूर हे लाभले होते. यावेळी उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष मा. दिलीपराज गोयनका, विशेष उपस्थिती म्हणून भारतीय सेवा सदनचे माजी कार्यकारिणी सदस्य डाॅ. एन. के. माहेश्वरी, कार्यकारिणी सदस्य मा. पवन माहेश्वरी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. चारुशिला रूमाले, उपप्राचार्य डाॅ. अंबादास पांडे, उपप्राचार्य प्रा. परिमल मुजुमदार हे विचारपीठावर उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांना एनसीसी पथकाच्या वतीने पायलेटिंग करून विचारपीठावर पाचारण करण्यात आले. यानंतर सर्व पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगे बाबा आणि श्रद्धेय माताजी राधादेवी गोयनका यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. सर्वप्रथम अमरावती विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तद्नंतर संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उद्घाटक आणि बीजभाषक यांचे भारताचे संविधान, स्मृतिचिन्ह, शाॅल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, ‘संविधान’ आपल्याला ज्या प्रकारे आपल्या अधिकारांची जाणीव करून देते त्याच प्रकारे राष्ट्राप्रति आपले कर्तव्य कोणती आहेत हे सुद्धा सांगते. सर्वांनी संविधानाचे वाचन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्राचार्य डाॅ. चारूशिला रूमाले यांनी स्वागत पर भाषण केले आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संविधान सर्वांना समान अधिकार प्रदान करते.डाॅ. आशिष मुठे यांनी उद्घाटक डाॅ. प्रशांत अमृतकर यांचा परिचय दिला. उद्घाटक डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी सर्वप्रथम डिजीटल बटन दाबून उद्घाटन झाल्याचे घोषित केले. डाॅ. अमृतकर यांनी उद्घाटनपर भाषणातून सांगितले की, राजकीय व्यवस्थेची दशा आणि दिशा यावर चिंतन होणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वतंत्रता हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे, असे ते म्हणाले. एआयच्या माध्यमातून व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला असून यामुळे अनेक आव्हाने आज राज्यघटनेपुढे निर्माण झाली आहेत. यानंतर बीजभाषक डाॅ. वेदप्रकाश मिश्रा यांचा परिचय डाॅ. रवींद्र मुंद्रे यांनी दिला. डाॅ. मिश्रा यांनी आपल्या बीजभाषणातून बोलताना ‘संविधान’ मात्र एक पुस्तक नसून ते एक ‘संकल्प’ रूपी मौलिक ग्रंथ आहे, असे मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांशी संवाद साधताना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात मनुष्याच्या मौलिक अधिकाराचे सार आहे. ‘स्वायत्त’ ही संकल्पना एक मृगजळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण जगात भारताची राज्यघटना सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उद्घाटन सत्र चे सूत्रसंचालन डॉ. विनोद खैरे यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. अजय शिंगाडे यांनी मानले. भारतीय संविधानावर राष्ट्रीय परिषदेत संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातून 330 संशोधक व प्राध्यापक यांनी सहभाग घेतला.
तांत्रिक सत्र-1 आणि तांत्रिक सत्र-2
सदर परिषदेमध्ये एकूण दोन शोधनिबंध सादरीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
यातील पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. भीमराव वाघमारे, माजी परीक्षा नियंत्रक, संगाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, तर परिक्षक म्हणून डॉ. वामन गवई, संविधानाचे अभ्यासक, अमरावती तर दुसरे परिक्षक म्हणून डॉ. पंकज तायडे, सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, संगाबाअवि, अमरावती हे लाभले होते. सर्वांचे यावेळी स्मृतिचिन्ह, संविधान आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सत्रात एकूण = 07 शोधकर्त्यांनी आपल्या शोधपत्रांचे वाचन केले. पहिल्या तांत्रिक सत्राचे संचालन डाॅ. रवींद्र मुंद्रे यांनी केले तर आभार डाॅ. नितीन चौधरी यांनी मानले. दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डाॅ. सुनीलदत्त गवरे, अध्यक्ष, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, परिक्षक म्हणून डाॅ. बी. एच. किर्दक तर दुसरे परिक्षक म्हणून डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी हे लाभले होते. या सत्रात एकूण= 06 शोधकर्त्यांनी आपल्या शोधपत्रांचे वाचन केले. या सत्राचे सूत्रसंचालन डाॅ. स्मिता भोंडे-देवर यांनी केले तर आभार प्रा. नरेंद्र मानमोठे यांनी मानले. या दोन्ही स्तरांमधून उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण करणाऱ्यांना समारोपीय सत्रात सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात अनुक्रमे प्रा. डाॅ. महेंद्र भगत आणि प्रा. मंजु बिहाउत-साहु हे सर्वोत्कृष्ट ठरले.
समारोपीय समारंभ
यानंतर शेवटी समारोपीय सत्र पार पडले. समारोपीय समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट श्रीमती आर. एन. बंसल, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला ह्या लाभल्या होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. चारूशिला रूमाले होत्या. यावेळी डाॅ. स्वप्निल इंगोले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय दिला. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. डाॅ. महेंद्र भगत, डाॅ. वेदप्रकाश डोणगांवकर आणि प्राचार्य डाॅ. विनय तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर डाॅ. विनोद खैरे यांनी अहवाल वाचन केले. त्यांनी आपल्या अहवाल वाचनातून परिषदेचा संपूर्ण अहवाल वाचन करून परिषदेत एकूण 324 शोधनिबंध प्राप्त झाल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्या अॅड. श्रीमती आर. एन. बंसल यांनी आपल्या भाषणातून भारताच्या कानाकोपऱ्यात संविधानाचा गंध दरवळतो आहे, असे नमूद करून संविधानामुळेच आपण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. प्राचार्य डाॅ. रूमाले यांनी दोन्ही तांत्रिक सत्रामध्ये शोधनिबंध वाचनाच्या माध्यमातून विचार मंथन करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शोधनिबंध वाचन करणारे प्रा. डाॅ. महेंद्र भगत आणि प्रा. मंजु बिहाउत-साहु यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपीय समारंभाचे सूत्रसंचालन डाॅ. स्वप्निल इंगोले यांनी तर डाॅ. आशिष मुठे यांनी सर्व उद्घाटन समारंभ, तांत्रिक सत्र, आणि समारोपाला लाभलेले सर्व पाहुणे-मान्यवरांचे, आयोजन समिती सदस्य, विविध समित्या समन्वयक आणि सदस्यांचे आभार मानले. यानंतर राष्ट्रगीताने परिषदेची सांगता करण्यात आली.या राष्ट्रीय परिषदेत प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, अभ्यासक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.