Archit Chandak : सामाजिक भान ठेवत समाजाने सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यानी केले. ते बाळापूर येथील ४ सप्टेंबर ला आयोजित बाळापूर उपविभागीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

बाळापूर : सामाजिक भान ठेवत समाजाने सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यानी केले. ते बाळापूर येथील ४ सप्टेंबर ला आयोजित बाळापूर उपविभागीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन ,तहसीलदार वैभवा फरतारे , बाळापूर ठाणेदार अनिल जुमळे , पातुर ठाणेदार हनुमंत ढोपेवाड , उरळ ठाणेदार पकंज कांबळे , चान्नी ठाणेदार रविंद् लांडे माजी नगराध्यक्ष मो. जमीर शे. इब्राहीम , सैय्यद ऐनोदीन खतिब व मिरवणूक समिती अध्यक्ष गजानन महाराज पुरी होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यानी तर संचालन ठाणेदार पंकज कांबळे यानी यानी केले , या प्रसंगी बाळापूर व पातुर तालुक्यातील चार ही पोलिस स्टेशन मधील शांतता समिती सदस्य , प्रतिष्ठित नागरिक , पोलिस पाटील , गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार प्रदर्शन बाळापूर ठाणेदार अनिल जुमळे यानी केले.