SP Nilesh Tambe : गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे राष्ट्रीय सण समजून एकोप्याने व शांततेत साजरे करावे, शांतता समितीच्या सदस्यांनी युवा पिढीला मोबाईलवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यास मनाई करावी, गणेश मंडळांनी पोलिस प्रशासन च्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. देऊळगाव राजा येथे २१ ऑगस्ट रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बाेलत हाेते.

देऊळगाव राजा : गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे राष्ट्रीय सण समजून एकोप्याने व शांततेत साजरे करावे, शांतता समितीच्या सदस्यांनी युवा पिढीला मोबाईलवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यास मनाई करावी, गणेश मंडळांनी पोलिस प्रशासन च्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. देऊळगाव राजा येथे २१ ऑगस्ट रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बाेलत हाेते.
जिल्हा पोलिस उप अधीक्षक अमोल गायकवाड यांनी गणेश मंडळांनी डीजे ऐवजी पारंपरिक बँड ढोल ताशेचा वापर केल्यास ध्वनी प्रदूषण होणार नाही, जेष्ठ नागरिकांना लहान मुलांना, रुग्णांना त्रास होणार नाही असे सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांनीही सन उत्सव साजरे करताना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी प्रमुख प्रामुख्याने पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, मुख्याधिकारी अरुण मोकळ, उप कार्यकारी अभियंता संदीप शेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ विलास दराडे, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी व इतर पोलिस अधिकारी होते. माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, सेवा निवृत्त मुख्याधापक प्रकाश खांडेभराड, रमेश नरोडे, यांच्यासह शहरातील प्रमुख संघटनेचे पदाधिकारी आणि इतर
शांतता समितीच्या सदस्यांनी बैठकीत सूचना केल्या, पत्रकार सूरज गुप्ता यांनी गणेशोत्सव दरम्यान प्रत्येक अधिकाऱ्यांनी कोणतेही एक मंडळ दत्तक घ्यावे अशी सूचना केली. सभेला देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, दुसरबीड, अंढेरा येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटना चे नेते, कार्यकर्ते, व पत्रकार उपस्थित होते,
सभेचे संचालन व आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी केले,