crime against senior technician : घरगुती वीज कनेक्शनचे सिंगल फेज ते थ्री फेज जोडणी करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी म.रा.वि.वि.कंपनीच्या वाशिम शहर भाग-१ कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण गजानन मुठाळ (वय ३०) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत २८ ऑगस्ट रोजी वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम : घरगुती वीज कनेक्शनचे सिंगल फेज ते थ्री फेज जोडणी करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी म.रा.वि.वि.कंपनीच्या वाशिम शहर भाग-१ कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण गजानन मुठाळ (वय ३०) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत २८ ऑगस्ट रोजी वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार (वय ३३, रा. मंगरुळपीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदारांचे ग्राहक पांडुरंग दौलतराव लहाने (रा. सिव्हिल लाईन, वाशिम) यांच्या घराचे वीज कनेक्शन थ्री फेजमध्ये बदलून देण्यासाठी आरोपीने ८ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष ४ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर ९, २० व २५ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. मात्र तक्रारदारावरील संशयामुळे आरोपीने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. अखेर पडताळणी व तपासणी अहवालावरून वरिष्ठ तंत्रज्ञाविरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कारवाईत अधीक्षक अभियंता (म.रा.वि.वि.कंपनी, वाशिम) यांनी सक्षम अधिकारी म्हणून काम पाहिले. तपासणी दरम्यान आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम युनिटच्या पथकाने केली. या पथकात पो.ह. नितीन टवलारकर, विनोद मारकंडे, राहुल व्यवहारे, योगेश खोटे व विनोद अवगळे यांचाही समावेश हाेता.