mahabreaking.com

Bogus school ID case : बाेगस शालार्थ आयडी प्रकरणी ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार 

Bogus school ID case : राज्यभर गाजत असलेल्या बाेगस शालार्थ आयडी प्रकरणी आता ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्व शिक्षकांना सायबर पाेलिसांकडून अटक हाेण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे.

bogus school ID case

नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या बाेगस शालार्थ आयडी प्रकरणी आता ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्व शिक्षकांना सायबर पाेलिसांकडून अटक हाेण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे.
पाच महिन्यांपूर्वी नागपुरात बाेगस शालार्थ आयडी काढून शासनाची लाखाे रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पाेलीस करीत आहेत. उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुरूवातीला २३३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे समाेर आणले हाेते. त्यानंतर पाेलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आराेपी निलेश वाघमारे याला पाेलिसांनी अटक केली आहे. तसेच माजी उपसंचालक सतीश मेंढे हे अद्यापही फरार आहेत. सायबर पाेलिसांनी केलेल्या तपासातून नागपूर विभागातील १ हजार ८० शिक्षकांचे शालार्थ आयडी बाेगस असल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर या प्रकरणात पाेलिसांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती दर्शवत अधिकाऱ्यांच्या मदतीने ६८० शिक्षकांनी शालार्थ आयडी मिळवल्याचे तपासात समाेर आले आहे. त्यामुळे, आता या शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top