mahabreaking.com

MLA Siddharth Kharat : निधीअभावी रखडला आरेगाव रस्ता; आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी

MLA Siddharth Kharat : डोणगाव येथून रिसोडकडे जाण्यासाठी आरेगाव मार्गे जाणारा रस्ता हा जवळचा असूनही, गत दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्ता खोदून अपूर्ण ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

MLA Siddharth Kharat

डोणगाव: डोणगाव येथून रिसोडकडे जाण्यासाठी आरेगाव मार्गे जाणारा रस्ता हा जवळचा असूनही, गत दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्ता खोदून अपूर्ण ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भातील बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक टाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुका प्रमुख निंबाजी पांडव आणि आरेगाव येथील पवन टाले यांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी सदर रस्त्याची पाहणी केली. यावेळी विनायक टाले यांनी आमदारांना रस्त्याबाबतची समस्या सांगून त्वरित काम सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी आमदार खरात यांनी उपविभागीय बांधकाम अधिकारी लोलोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि रस्ता का पूर्ण करण्यात आलेला नाही, याबाबत विचारणा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या निधी उपलब्ध नसल्याने काम बंद आहे.
यावर आमदारांनी, “रस्ता काम रखडले असले तरी वाहनांची ये-जा कशी होणार?” असा सवाल उपस्थित केला. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, आठवडाभरात रस्ता वाहनचालकांसाठी सुकर करण्यात येईल. त्यामुळे पुढील आठवड्यात खड्डे बुजविण्याचे काम होणार आहे. मात्र निधी उपलब्ध होईपर्यंत पूर्ण रस्त्याचे काम सुरू होणार नाही, हे निश्चित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top