Mana river : तीन युवक पिंपळखुटा येथील मन नदीच्या पात्रात पाेहायला गेले हाेते. त्यापैकी एक युवक बुडाला तर दाेन जण सुखरुप बाहेर आले. बुडालेल्या युवकाचा प्रशासनाकडून शाेध सुरू करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी ११ वाजता घडली.
राहुल सोनोने
वाडेगाव : तीन युवक पिंपळखुटा येथील मन नदीच्या पात्रात पाेहायला गेले हाेते. त्यापैकी एक युवक बुडाला तर दाेन जण सुखरुप बाहेर आले. बुडालेल्या युवकाचा प्रशासनाकडून शाेध सुरू करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी ११ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळखुटा येथील मन नदीत नागेश तेजराव वानखडे (वय २९) ,पवन (गोलू) देवलाल वानखडे (वय २९), करण सुनील वानखडे ( वय २८) हे तीन मित्र पाेहायला गेले हाेते. तीन मित्रा मधील नागेश तेजराव वानखडे व पवन (गोलु)देवलाल वानखडे हे दोन मित्र सुखरूप असून त्यामधील करण सुनील वानखडे मात्र बुडाला. यावेळी वंदे मातरम कुरणखेड आपत्तीकालीन शोध व बचाव पथक युवकाचा शोध घेण्याचा अथक परिश्रम घेत आहेत .परंतु त्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणतही यश मिळाले नाही. यावेळी तहसीलदार पातुर डॉ. राहुल वानखेडे व चान्नी पोलीस स्टेशन ठाणेदार रवींद्र लांडे हे सकाळपासून या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.