mahabreaking.com

OBC reservation: ओबीसी आरक्षणास बाधा आणणारा अध्यादेश रद्द करा; प्रशासनास दिले निवेदन 

OBC reservation: महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षणासबाधा पोहोचेल अशा प्रकारचा अध्यादेश २ सप्टेंबरला निर्गमित केला होता तो अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांच्या वतीने देऊळगाव राजा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
OBC reservation
गजानन तिडके 
देऊळगाव राजा : महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षणासबाधा पोहोचेल अशा प्रकारचा अध्यादेश २ सप्टेंबरला निर्गमित केला होता तो अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांच्या वतीने देऊळगाव राजा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 राज्यभर आरक्षण संदर्भात मुद्दा गाजत असताना ओबीसी समाजाच्या एकूण ४०० हून अधिक जातीच्या हक्कावर गदा येईल अशा प्रकारचा शासन निर्णय २ सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून निर्गमित करण्यात आला होता. त्यामध्ये मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाची जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आला आहे. हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर असवैधानिक आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातीच्या हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घडणार आहे. त्यामध्ये घटनात्मक उल्लंघन अनुच्छेद १५ (४) व १६ (४) प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना देता येते मराठा समाजाचा समावेश हा या तत्त्वाची भंग आहे, अन्यायकारक परिणाम – आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलले जाईल.  सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगाने स्पष्ट केले आहे की केवळ राजकीय दबा खाली जातीचा समावेश आरक्षणात करता येत नाही याला अनुरूप आज देऊळगाव राजा येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दोन सप्टेंबर २०२५ रोजी जो आदेश निर्गमित केला तो तात्काळ मागे घेण्यात यावा, तसेच ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्याय समावेश होऊ नये, ओबीसी आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा येणारा सदर निर्गमित अध्यादेश रद्द करावा अशा प्रकारची मागणी ओबीसी बांधवांच्या वतीने तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सदाशिव मुंडे तालुका अध्यक्ष समता परिषद, राजेंद्र खांडेभराड, विलास माळोदे, प्रकाश खांडेभराड, विष्णू झोरे, प्रदीप वाघ,दिलीप शेजुळकर, मनोज खांडेभराड, अरविंद खांडेभराड, गणेश झोरे, निलेश गीते, धर्मराज हनुमंते, प्रकाश अहिरे, बळीराम मापारी,सुदर्शन गीते,अनिल वाघ, विजय खांडेभराड, शुभम भाग्यवंत, आतिश दंडे, योगेश खांडेभराड, ज्ञानेश्वर तिडके, आकाश बोराटे, गणेश मुंडे, देवानंद हिवाळे, विठ्ठल निंबाळकर, यांच्यासह शेकडो ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top