Balapur : शहरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले. गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघाेषाने बाळापूर नगरी दुमदुमली हाेती.
बाळापूर : शहरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले. गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघाेषाने बाळापूर नगरी दुमदुमली हाेती.
बाळापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्य चौकात पोहोचली. यावेळी मानाच्या बारभाई गणपतीची आरती व पूजा आमदार नितीन देशमुख आणि विसर्जन मिरवणूक समिती अध्यक्ष गजानन महाराज पुरी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर मिरवणुकीला मुख्य मार्गाने सुरुवात झाली.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने माजी नगराध्यक्ष मो. जमीर (जम्मुशेठ) शेख इब्राहीम, डॉ. फैय्याज अन्सारी आदींनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले तसेच पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.
ठाणेदार अनिल जुमळे, तहसीलदार वैभव फरतारे यांच्यासह पोलीस व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. गणेश विसर्जन मिरवणूक समिती अध्यक्ष गजानन महाराज पुरी, सदस्य अशोक मंडले, गणेश धोपटे, रमेश लोहकरे, शामराव शेलार, आनंद बनचरे, सुरेंद्र घोपटे तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक शांततेत पार पडली.