mahabreaking.com

local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेना सज्ज 

local body elections : दाेन ते तीन वर्षानंतर हाेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सज्ज झाला असून ५ सप्टेंबर राेजी आढावा बैठक घेवून जिल्हा परिषदेचे गट आणि गणनिहाय तसेच नगर पालिकानुसार चर्चा करण्यात आली. यासाठी शहर प्रमुख, तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचा वस्तुनिष्ठ अहवालरुपी आढावा शुक्रवारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
local body elections

बुलढाणा : दाेन ते तीन वर्षानंतर हाेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सज्ज झाला असून ५ सप्टेंबर राेजी आढावा बैठक घेवून जिल्हा परिषदेचे गट आणि गणनिहाय तसेच नगर पालिकानुसार चर्चा करण्यात आली. यासाठी शहर प्रमुख, तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचा वस्तुनिष्ठ अहवालरुपी आढावा शुक्रवारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.

            बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भावनात शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, आमदार सिद्धार्थ खरात, सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहत्रे, वसंतराव भोजने , डी.एस.लहाने, जिल्हा समन्वयक तथा निवडणूक प्रमुख संदीप  शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे,  विजयाताई खडसान, जिल्हा संघटक अॅड. सुमित सरदार, डॉ. गोपाल बच्छिरे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे , गजानन धांडे यांनी मार्गदर्शन केले.होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील प्रत्येक मतदार संघातील नगरपरिषद, जिल्हा परिषद गट,व पंचायत समिती गण या संदर्भात माहिती दिली.        यावेळी किसान सेना जिल्हाप्रमुख अशोक मामा गव्हाणे, गजानन बिलेवार, उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, बद्रीनाथ बोडखे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर ,तालुकाप्रमुख दादाराव खार्डे , विजय इतवारे, विजयकुमार इंगळे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील, तालुकाप्रमुख श्रीकिसन धोंडगे, तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार, श्रीराम खेलदार, राजेंद्र बुधवत, सिद्धेश्वर आंधळे, संजय दांडगे, हर्षल आखरे, विधानसभा समन्वयक  संजय वडतकर,  विधानसभा संघटक विजय बोदडे,  भीमराव पाटील, अरुण खडके, विष्णू मुरकुटे, सुनील घाटे, विजय बोदडे, शहर प्रमुख किशोर गारोळे, हरिदास गनबास, रवींद्र जैन, गजानन जाधव, नारायण हेलगे, योगेश पल्हाडे, रमेश ताडे , उल्हास भुसारे, युवा सेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, एडवोकेट आकाश घोडे , अनिल नरोटे, बी.टी. मस्के यांचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

           मेहकर व लोणार तालुकाच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गट आणि गण या दृष्टीने आपण स्वतः जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहू. या निवडणुकीत लक्ष घालून कार्यकर्त्यांच्या सत्ता पदासाठी जोमाने लढू अशी ग्वाही मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.
  जिल्हा परिषदेवर भगवा फडकवू : जालिंदर बुधवत
        येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील आज संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गट, गण या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक पातळीवर समीकरण यांचा अहवाल पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या माध्यमातून भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top