Ganpati Bappa Morya: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात डाेणगावात ६ सप्टेंबर राेजी गणरायांना निराेप देण्यात आला. यावेळी सकाळीच गणपती बाप्पांच्या मिरवणूकीला प्रभात फेरी मार्गाने सुरवात झाली.या मिरवणुकीत गावातील १४ गणेश मंडळ सहभागी झाले होते.

डोणगाव : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात डाेणगावात ६ सप्टेंबर राेजी गणरायांना निराेप देण्यात आला. यावेळी सकाळीच गणपती बाप्पांच्या मिरवणूकीला प्रभात फेरी मार्गाने सुरवात झाली.या मिरवणुकीत गावातील १४ गणेश मंडळ सहभागी झाले होते तर अष्टविनायक गणेश मंडळ यांने पारंपरिक पद्धतीने टाळ मृंदगाच्या निनादात गणपती बाप्पा ला निरोप देऊन डिजे मुक्तीचा संदेश दिला. गावातील अनेक गणेश मंडळांनी खर्च टाळीत दुपारीच गणेशाचे विसर्जन करून अवास्तव खर्च टाळण्याचा संदेश दिला. ८ गणेश मंडळांनी संपूर्ण प्रभात फेरी मार्गाने मिरवणूक काढली. यामध्ये बालगोपाल मंडळी व तरुणांचा उत्साह दिसून येत होता. यावेळी प्रभात फेरी मार्गाने गणेश मंडळाच्या नास्त्याची व्यवस्था सामाजिक संघटना यांनी केली होती तर अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान ठाणेदार अमरनाथ नागरे व शांतता समितीचे सदस्य यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर दुसर्या दिवशी ७ सप्टेबरला डोणगाव पोलीस स्टेशनच्या गणरायांना निराेप देण्यात आला. पाेलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाणेदार अमरनाथ नागरे यांनीही ठेका धरला हाेता.