Laxmikant Kauthkar : महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पावसात खंड नसल्याने शेतकऱ्यांना तणांचा बंदोबस्त करणे कठीण होत असून, या पार्श्वभूमीवर तणनाशकाला सहनशील अशा अनधिकृत HTBT कापसाच्या वाणाला सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी केली. यासाठी त्यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.तसेच निवेदन दिले.

राहुल साेनाेने
वाडेगाव : महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पावसात खंड नसल्याने शेतकऱ्यांना तणांचा बंदोबस्त करणे कठीण होत असून, या पार्श्वभूमीवर तणनाशकाला सहनशील अशा अनधिकृत HTBT कापसाच्या वाणाला सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी केली. यासाठी त्यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.तसेच निवेदन दिले.
विदर्भातील प्रमुख पीक कापूस असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर HTBT कापसाच्या अनधिकृत बियाण्यांची लागवड करीत आहेत. हे वाण सरकारी मान्यतेशिवाय बाजारात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. मात्र या वाणामुळे तणनियंत्रण सोपे होत असून शेतीचा उत्पादन खर्च कमी होत असल्याने याला मान्यता द्यावी, अशी मागणी संघटनेने केली.
या चर्चेदरम्यान मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्याशी संबंधित विविध योजनांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
या वेळी शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, नानासाहेब क्रांती ब्रिगेडचे शिवाजीराव नादखीले, पंकज माळी आदी उपस्थित होते.