Vitthal Kangane :पैसा , शेती वाडी ,सत्ता नसली तरी सर्वाना बुध्दी च्या बळावर शिक्षण घेऊन कुठल्याही क्षेत्रात मान सन्मान मिळवता येतो. या साठी मात्र विघार्थी , विघार्थीनीनी मोबाईल सोडून अभ्यासात एकाग्रता ठेवून आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात यशस्वी होता येईल असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. बाळापूर येथील उत्सव मंगल कार्यालयात ५ सप्टेंबर रोजी आयोजीत विघार्थी संवाद मेळाव्यात ते बाेलत हाेते .

बाळापूर : पैसा , शेती वाडी ,सत्ता नसली तरी सर्वाना बुध्दी च्या बळावर शिक्षण घेऊन कुठल्याही क्षेत्रात मान सन्मान मिळवता येतो. या साठी मात्र विद्यार्थी , विद्यार्थीनीनी मोबाईल सोडून अभ्यासात एकाग्रता ठेवून आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात यशस्वी होता येईल असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. बाळापूर येथील उत्सव मंगल कार्यालयात ५ सप्टेंबर रोजी आयोजीत विद्यार्थी संवाद मेळाव्यात ते बाेलत हाेते .
बाळापूर शहरातील कासारखेड परिसरातील महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सव निमित्त आयोजित विद्यार्थी संवाद मेळावाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद धनोकार मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश नावकार , माजी आ, बळीरामजी शिरस्कार , जयंतराव मसने , प्रकाश तायडे ,प्रा संतोष हुसे, पंढरीशेठ हाडोळे , गणेश आसोलकार,गणेश मंडळाचे प्रथम अध्यक्ष गोवर्धन धनोकार, उद्योजक सचिन कोकाटे, तहसीलदार बाळापूर वैभव फरतारे , ठाणेदार अनिल जुमळे होते.
विद्यार्थी संवाद मेळाव्यात बोलताना व्याख्याते विठ्ठल कांगणे यानी विद्यार्थ्यांना शिक्षणाला महत्त्व द्या, मोबाईलमध्ये अडकू नका आई बाबांचे नाव निघावे या साठी आपल्याकडे शेती पैसा नसला तरी बुध्दीची देवता असलेल्या गणपती समोर प्रार्थना करा व आपल्या बुध्दीला चालना देऊन अभ्यास करा.छत्रपती शिवाजी महाराज , डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन पुढे जावे. ज्या गरीब होतकरु मुला मुली ना खरोखरच पुढे जायचे असेल त्यांनी माझ्या कडे यावे त्यांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी आहे. मोबाईल च्या विश्वातुन बाहेर निघा जग बघा असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
संचालन दीपक हाडोळे प्रास्ताविक रमेश लहाने आभार नितीन हुसे यांनी मानले.