Ganja smuggler : जिल्ह्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खामगाव शहरातील सराईत गांजा तस्करावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती अधिनियम-१९८१ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हैदर खान अनवर खान (३६, रा. हरी फेल, खामगाव) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खामगाव : जिल्ह्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खामगाव शहरातील सराईत गांजा तस्करावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती अधिनियम-१९८१ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हैदर खान अनवर खान (३६, रा. हरी फेल, खामगाव) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि आगामी सण, उत्सव पार पाडताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांच्या जीविताला किंवा मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून धोकादायक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या आदेशानुसार, तपास करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हैदर खान याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. खान याला प्रथम जिल्हा मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे तीन आठवडे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला येरवडा कारागृह, पुणे येथे स्थलांतरित केले जाणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कारवाईत पोनि. सुनील अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोनि. रामकृष्ण पवार (खामगाव शहर), पोहेकॉ. संजय भुजबळ, पोना. राकेश नायडू, सपोनि. विकास पाटील, सफो. काळे, पोहेकॉ. अरुण हेलोडे, पोकॉ. राम धामोळे, विष्णू चव्हाण व अमर ठाकूर यांनी केली.