Shelgaon-Dongaon road : मेहकर तालुक्यात काही दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. त्यामुळे, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शेलगाव देशमुख ते डाेणगाव रस्त्याचीही पावसामुळे दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी माेठ माेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे, या रस्त्याने बस चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच कऱ्हाळवाडी गावाजवळ असलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे, या मार्गावर बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
डोणगाव : मेहकर तालुक्यात काही दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. त्यामुळे, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शेलगाव देशमुख ते डाेणगाव रस्त्याचीही पावसामुळे दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी माेठ माेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे, या रस्त्याने बस चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच कऱ्हाळवाडी गावाजवळ असलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे, या मार्गावर बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
मेहकर तालुक्यातील रस्त्याची सततच्या पावसामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांना या रस्त्याने वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच आता कऱ्हाळवाडीजवळील पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावर बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे, शेलगाव देशमुख, कनका, इसवी ,कऱ्हाळवाडी आदी गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कऱ्हाळवाडी नजीक असणाऱ्या पुलाची तात्काळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पूल दुरुस्त करून थांबवावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.