mahabreaking.com

China supports India : दहशतवादविरोधी लढ्यात चीनने दिला भारताला पाठिंबा; पाकिस्तानला झटका 

China supports India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेण्याची आग्रही मागणी केली. जिनपिंग यांनी मोदींची मागणी मान्य केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
China supports India
बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेण्याची आग्रही मागणी केली. जिनपिंग यांनी मोदींची मागणी मान्य केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांवर बंदी घालण्यास चीनने यापूर्वी अडथळा आणला होता. या पार्श्वभूमीवर हा पाठींबा महत्वाचा मानला जात आहे.
मोदी आणि जिनपिंग यांच्यातील महत्त्वपूर्ण भेटीकडे जगाचे लक्ष लागले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल ५० मिनिटे चर्चा झाली. त्यात अमेरिकेच्या टॅरिफला शह देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी यांनी जिनपिंग यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. द्विपक्षीय संबंध राजकीय आणि दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने अधिक बळकट करण्यासाठी समन्वयाने काम करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
चीनच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी लढ्याला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे, कारण चीन हा पाकिस्तानचा जवळचा मित्र मानला जातो. तथापि, याआधी चीनने संयुक्त राष्ट्रांत भारताच्या प्रस्तावांना विरोध केला होता, त्यामुळे चीन आता किती आणि कशा प्रकारे सहकार्य करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी-पुतीन यांचा एका कारने प्रवास
एससीओ शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन द्विपक्षीय चर्चेसाठी निघाले असताना, पुतीन यांनी मोदींना त्यांच्या आलिशान ऑरस लिमोझिन कारमध्ये घेऊन गेले. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एक-एक चर्चा सुरूच राहिली. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही ते कारमधून बाहेर पडले नाहीत आणि सुमारे ५० मिनिटे गोपनीय चर्चा केली.
रशियाच्या रेडिओ चॅनेल बेस्टी एफएमने ही माहिती दिली. मॉस्कोच्या राजकीय विश्लेषकांचा विश्वास आहे की, कारमधील ही चर्चा दोन्ही नेत्यांमधील सर्वात महत्त्वाची आणि गोपनीय संभाषण होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top