Jalgaon zp : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाची रचना २२ ऑगस्ट राेजी अंतिम झाली आहे. आता गणेश उत्सवानंतर आरक्षण जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आता इच्छुकांचे लक्ष या आरक्षण साेडतीकडे लागले आहे.

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाची रचना २२ ऑगस्ट राेजी अंतिम झाली आहे. आता गणेश उत्सवानंतर आरक्षण जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आता इच्छुकांचे लक्ष या आरक्षण साेडतीकडे लागले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेची गट व गण रचना १४ जुलै रोजी जाहिर झाली होती. त्यानंतर त्या प्रारूप रचनेवर हरकती मागवण्यात आल्या हाेत्या. जिल्हयातून १२१ हरकती आल्या होत्या. त्यांच्यावर सुनावणी झाल्यानंतर काही गट व गणांमध्ये थोडा बदल करत प्रशासनाने ६८ गट व १३६ गणांची अंतिम रचना दि.२२ ऑगष्ट रोजी जाहिर केली आहे. गट व गणांची अंतिम रचना जाहिर करत असतांना शासनाने आरक्षणासाठी आता नविन नियमावली जाहिर केली असल्याने अनेक माजी सदस्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. नव्या नियमावलीनुसार कसे आरक्षण निघेल याचे आडाखे आता ईच्छुकांकडून बांधले जात आहे.
येत्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल हे स्पष्ट आहे. परंतु सरसकट सर्व गट व गणांमध्ये भाजपा हा महायुतीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याशी युती करेल की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. पक्षीय प्राबल्य बघूनही त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे अद्याप तरी ठरले नाही. त्याकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे.