SET exam : जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील कनिष्ठ विभागातील कॉमर्स विभागाचे प्राध्यापक संभाजी शिवाजी माने यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (SET) उल्लेखनीय यश मिळवले आहे.
बुलढाणा : जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील कनिष्ठ विभागातील कॉमर्स विभागाचे प्राध्यापक संभाजी शिवाजी माने यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (SET) उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाने जिजामाता महाविद्यालयातील कनिष्ठ विभागामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रा. माने यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली. या यशात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई, तसेच सहकारी शिक्षक मृणालिनी सपकाळ, वैशाली मोरे, शशिकांत चव्हाण, नदीम सर, किरण सर, पुष्पा वानखेडे, सुनिता काळवाघे, स्नेहल राऊत, प्रणिता पाटील आणि रजनी निखाडे, रंगारी बाबूजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रा. माने यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या आई श्रीमती शारदा शिवाजी माने यांचे प्रोत्साहन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि महाविद्यालयातील सकारात्मक वातावरणाला दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई यांनी प्रा. माने यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले, “प्रा. माने यांचे हे यश केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे हे यश इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”