Insurance cheque : बुलडाणा अर्बन शाखा, बाळापूर येथे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसास विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते स्व. संजय पांडुरंग काळे यांचा २१ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी बुलडाणा अर्बनमध्ये ठेव (Deposit) करताना संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या अपघाती विमा संरक्षण योजनेचा लाभ घेतला होता.
बाळापूर : बुलडाणा अर्बन शाखा, बाळापूर येथे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसास विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते स्व. संजय पांडुरंग काळे यांचा २१ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी बुलडाणा अर्बनमध्ये ठेव (Deposit) करताना संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या अपघाती विमा संरक्षण योजनेचा लाभ घेतला होता.या घटनेची माहिती मिळताच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी), अध्यक्ष सुकेश झंवर, सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या आदेशानुसार आणि अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक विजय खाडिलकर यांनी मयत संजय काळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
शाखेकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीमार्फत ६ लाख ६० हजार ४०१ रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. आज हा धनादेश वारसदार अरुणा संजय काळे यांना सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी, शाखा व्यवस्थापक विजय खाडिलकर, अनंत वानखडे, गजानन ग्रुपचे देवेंद्र जुमळे, राजेंद्र बावनठाणे, गणेश धोपटे, शिवसेना शहरप्रमुख आनंद बनचरे, शिवपालसिंह शेखरवार तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.