mahabreaking.com

Good news for TET passed students : जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, प्रमाणपत्रांचे वितरण सुरू 

Good news for TET passed students : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नाेव्हेंबर २०२४ राेजी आयाेजित करण्यात आली हाेती. या परीक्षेचा निकाल १४ फेब्रुवारी २०२५ राेजी जाहीर करण्यात आला हाेता. मात्र, प्रमाणपत्रांचे वितरण
रखडले हाेते. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला या प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचा मुहुर्त सापडला असून २९ ऑगस्टपासून प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
 Good news for TET passed students

बुलढाणा  :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नाेव्हेंबर २०२४ राेजी आयाेजित करण्यात आली हाेती. या परीक्षेचा निकाल १४ फेब्रुवारी २०२५ राेजी जाहीर करण्यात आला हाेता. मात्र, प्रमाणपत्रांचे वितरण रखडले हाेते. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला या प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचा मुहुर्त सापडला असून २९ ऑगस्टपासून प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. जिल्ह्यात टीईटीचा पहिला पेपर १०० तर दुसरा पेपर १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्रे घेवून जावीत असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी केले आहे.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नाेव्हेंबर २०२४ राेजी राज्यभरात घेण्यात आली हाेती. जिल्ह्यात ११ केंद्रावर ही परीक्षा पार पडली हाेती. या परीक्षेत जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांनी पहिला पेपर तर १२१ विद्यार्थ्यांनी दुसरा पेपर उत्तीर्ण केला हाेता. पहिला पेपर पहिली ते पाचवी आणि दुसरा पेपर सहावी ते आठवीसाठी शिक्षक पदासाठी आवश्यक आहे.अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आता या परीक्षेचे गुणपत्रक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे उपलब्ध झाले आहेत. पात्र उमेवारांनी कार्यालयीन वेळेत २९ ऑगस्टपासून ते १० सप्टेंबरपर्यंत संपर्क साधून आपले प्रमाणपत्र घेवून जावेत, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहेत.
प्रमाणपत्रांसाही ही कागदपत्रे आवश्यक
परीक्षा प्रवेशपत्र,  गुणपत्रिका,  डी.टी.एड किंवा बी.एड उत्तीर्ण गुणपत्रक,  आरक्षण प्रवार्गाचे जात प्रमाणपत्र,  दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र,  माजी सैनिक असल्यास पुरावा,   ओळखपत्र आधार/पॅन/निवडणुक इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top