mahabreaking.com

Amit Satam : भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती 

Amit Satam : आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केली आहे.  मंत्री आशिष शेलार यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 Amit Satam
मुंबई: आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केली आहे.  मंत्री आशिष शेलार यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साटम यांच्या नियुक्तीने आ. प्रवीण दरेकर यांना आशेवर पाणी फेरले आहे.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आ साटम शिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत ४९ वर्षीय साटम यांच्या नावाची घोषणा केली. साटम एकवेळा नगरसेवकदेखील होते. मुंबईतील पायाभूत सुविधा, नागरी समस्यांचा अभ्यास असलेला तरुण नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. विधानसभेत मुंबईशी निगडित अनेक विषयांची ते मांडणी करत आले आहेत. तसेच ते तीन वेळा आमदार राहीलेले आहेत.  ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीए म्हणूननही त्यांनी काम केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top