Bus stopped : धनज बु येथे कारंजा ते अमरावती बस अडवून जवळपास दीड तास प्रवाशांना वेठीस धरणे एका युवकाला चांगलेच महागले. बस चालकाच्या फिर्यादीवरून या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश सुभाष गवई (वय ३७) असे आराेपी युवकाचे नाव आहे.
वाशिम : धनज बु येथे कारंजा ते अमरावती बस अडवून जवळपास दीड तास प्रवाशांना वेठीस धरणे एका युवकाला चांगलेच महागले. बस चालकाच्या फिर्यादीवरून या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश सुभाष गवई (वय ३७) असे आराेपी युवकाचे नाव आहे.
बस चालक दिलीप व्यवहारे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार धनज बु मार्गे कारंजा अमरावती बस मंगेश गवई ह्या युवकाने अडवली. याबाबत बस चालकाने त्याला बस अडवण्याचे कारण विचारले असता.त्याने सदर रस्त्याला पडलेले खड्डे आता च बुजवा अशी मागणी केली.त्याला चालक व्यवहारे व वाहक मो. इरशाद मो. इब्राहिम यांनी रस्त्याच्या मधून उठण्याची विनवणी केली.परंतु त्या युवकाने सदर चालक व वाहक यांच्या शी अरेरावी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.त्यामुळे चालकाने डायल ११२ वर कॉल करून धनज पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती दिली. तात्काळ धनज पोलीस घटना स्थळी पोहचले व युवकाला समजून रस्ता मोकळा करण्यास सांगितले .परंतु त्याने पोलिसांना देखील जुमानले नाही.त्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला उचलून गाडी मध्ये टाकले व दिड तासापासून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली.याबाबत सदर युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार भारत लसंते यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार गजानन वर करीत आहे.