mahabreaking.com

Divisional Commissioner Papalkar: अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी : विभागीय आयुक्त पापळकर

Divisional Commissioner Papalkar:  “प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

Divisional Commissioner Papalkar

छत्रपती संभाजीनगर : “प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंत अधिकारी-कर्मचारी तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त पापळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला आस्थापना विभागाचे अपर आयुक्त राजेंद्र अहिरे, गटविकास अधिकारी राजेंद्र महाजन, कक्ष अधिकारी मिलिंद म्हस्के, दिलीप भूमरे, अनिल टेकाळे, सुवर्णा शिदे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक उपस्थित होते.यावेळी मिलिंद तुरूकमारे, सुनील नवले, मनोजकुमार येरोळे, मण्मथ मुक्तापुरे, सचिन काडवादे, शितल उमप, नंदकिशोर वानखेडे, सुखदेव शेळके, मधुकर मोरे, पुष्पा काळे, विजयसिंह नलावडे, धनंजय भोसले, गोपीनाथ इंगोले आदींचा सत्कार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top