mahabreaking.com

सण-उत्सव एकोप्याने साजरे करा;-जिल्हाधिकारी  डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

बुलढाणा: जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. हे सण राष्ट्रीय उत्सव समजून एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज केले.

बुलढाणा: जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. हे सण राष्ट्रीय उत्सव समजून एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज केले.

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड, राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात गणेशोत्सव, ईद -ए-मिलाद यासह आगामी काळातील सण, उत्सव ‘हा आपला सण’ ही एकात्मतेची भावना ठेवून साजरे करावेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परस्परांप्रती एकतेची भावना ठेवावी. भरकटलेल्या तरुणांचे प्रबोधन करण्याची गरज असून समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घेवून तरुणांना मार्गदर्शन करावे. समाजमाध्यमांचा गैरवापर टाळावा. सण, उत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही, ही जबाबदारी समजून समाजबांधवांनी योगदान द्यावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाद-विवाद, अफवांना बळी पडू नये. सण, उत्सवाच्या काळात दारुबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. 

पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की, गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आनंदाने साजरा करावा. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची दक्षता घेण्यात येईल. सण, उत्सवाच्या दरम्यान समाजमाध्यमांवर अपप्रचार किंवा शांतता भंग करणारे आक्षेपार्ह संदेश, मजकूर रोखणे ही आपली जबाबदारी आहे. शांतता समितीच्या सदस्यांनी देखील यांची दक्षता घ्यावी. यासाठी आतापासूनच अंमलबजावणी सुरु करावी. तरुण मंडळींना योग्य मार्ग लावणे हे आपले काम असून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सणे, उत्सवात प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे गरजेचे असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top