11 sheep killed : भरधाव बसच्या धडकेत दहा माेठ्या आणि एक लहान मेंढ्या ठार झाल्या. ही घटना २७ ऑगस्ट राेजी माेताळा तालुक्यातील खडकी फाटा येथे घडली. या अपघातात मेंढापाळाचे तब्बल एक लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

माेताळा : भरधाव बसच्या धडकेत दहा माेठ्या आणि एक लहान मेंढ्या ठार झाल्या. ही घटना २७ ऑगस्ट राेजी माेताळा तालुक्यातील खडकी फाटा येथे घडली. या अपघातात मेंढापाळाचे तब्बल एक लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वारुळी (ता. मोताळा) येथील शांताराम संजु बिचकुळे (वय १८) यांचे कुटुंब मेंढीपालन करून उदरनिर्वाह करते. मागील दोन महिन्यांपासून ते मेंढ्या चारण्यासाठी खडकी फाटा परिसरात मुक्कामी होते. २७ ऑगस्ट राेजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शांताराम व त्यांचा लहान भाऊ संतोष मोताळा-बुलडाणा रोडने मेंढ्या चारत होते. याचदरम्यान बुलडाणा वरून मोताळा-मलकापूरकडे जाणारी एसटी बस (क्र. MH-20-BN-4036) आली आणि बस चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या धडकेत १० मेंढ्या व १ लहान मेंढी जागीच ठार झाल्या, तर ५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतरही बस चालकाने वाहन न थांबवता बससह पसार झाल्याचे बिचकुळे यांनी पोलिसांना सांगितले.
या अपघातामुळे शांताराम बिचकुळे यांचे अंदाजे १ लाख ५८ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी आराेपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.